एरंडोलला छत्रपती शिवरायांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा..
प्रतिनिधी एरंडोल- येथे सालाबादप्रमाणे 6 जून हा दिवस राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. 6 जून 2024 हे वर्ष म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 350 वे वर्ष होय. शिवराज्याभिषेक सोहळा हा म्हणजेच सर्वसामान्य रयतेसाठी लोकशाही राज्य स्थापन करणार्या आणि सामान्य माणसांना हाताशी घेऊन निर्माण केलेल्या स्वराज्याला मूर्त रूप देण्याचा दिवस होय. हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे.
याप्रसंगी एरंडोल महाविद्यालयाचे अध्यक्ष अमितदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी संभाजी आबा देसले, आर. डी. पाटील, भावसार दादा, मुकेश देवरे, भाईदास पाटील, हिम्मत पाटील, आर. झेड. पाटील, शेखर पाटील, अक्षय तोतला , गोटू पाटील, पंकज पाटील, राकेश पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते