एरंडोल येथे मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी – एरंडोल येथे जागतिक योग दिनानिमित्त मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.१८ जुन ते २१ जुन दरम्यान संत सेना महाराज हॉल गढी खाली रविंद्र दौलत पाटील यांच्या घराशेजारी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान करण्यात आले असून केले असून सदर प्रशिक्षण शिबिरात योगासनां विषयी माहिती तसेच त्यांचे फायदे,प्राणायाम इत्यादी विषयी माहिती दिली जाणार आहे.
सदर शिबिर सर्वांसाठी मोफत असून स्त्री पुरुष मुलं मुली इत्यादींनी योग प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन योग प्रशिक्षक डी. टी.देशमुख यांनी केले आहे.