ओ बी सी आरक्षणामध्ये इतरांना आरक्षण देण्यास एरंडोल येथे विरोध, रास्ता रोको आंदोलन….
एरंडोल प्रतिनिधी – ओ बी सी आरक्षणामध्ये इतर समाजांना आरक्षण देण्याच्या विरोधात एरंडोल येथे ओ बी सी समाजातर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अमळनेर नाक्या नजिक दि.२१ जून २०२४ रोजी सकाळी ११.३० ते ११.४५ दरम्यान जवळपास १५ ते २० मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यावेळी पोलिस निरीक्षक सतीश बोराडे व नायब तहसीलदार दिलीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.जालना जिल्ह्यात लक्ष्मण हाके या ओ बी सी कार्यकर्त्याने आरक्षण बचावासाठी ९ दिवसांपासून सुरू केलेल्या प्राणांतिक उपोषणास पाठिंबा देण्यासाठी एरंडोल येथील सर्व ओ बी सी समाज एकवटला.त्यांच्या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल शासनाचा तीव्र धिक्कार करण्यात आला.शासनाने त्यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या आंदोलनात माजी जि.प. सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,दशरथ महाजन, राजेंद्र चौधरी,रमेश महाजन, विजय महाजन, अशोक चौधरी, कैलास महाजन,गोरख चौधरी, पुंडलिक चौधरी, भगवान महाजन, हिंमत महाजन,विजय गायकवाड, रमेश महाजन, जितेंद्र महाजन,हरिश महाजन, विठ्ठल आंधळे, आनंदा चौधरी, गणेश महाजन ,दिगंबर बोरसे, प्रविण बडगुजर, विनोद लखारी,दगडू महाजन, कैलास चौधरी आदी ओ बी सी समाज बांधव सहभागी झाले होते.