नागरी सुविधा पुरविण्यास एरंडोल नपा असमर्थ..विद्या नगर,साने गुरुजी, अष्टविनायक कॉलनीसह नविन वसाहत यांची स्वतंत्र ग्राम पंचायत व्हावी नपा यांचे कडे मागणी.

IMG-20240717-WA0142~2

एरंडोल-धरणगाव रस्त्याकडील साने गुरुजी कॉलनी ‌ते बोहरी हाॅस्पिटल व‌‌ अष्टविनायक ‌, नम्रतानगर , लक्ष्मी नगर , आदर्श नगर , मधूकर नगर इतर वसाहतीत नागरी सुविधा देण्यासाठी नगर पलिका ही असमर्थ असल्याने या काॅलनी परिसरासाठी स्वतंत्र ग्राम पंचायत निर्माण करावी अशी मागणी मौर्य क्रांती संघ जिल्हा अध्यक्ष रवींद्र लाळगे व कॉलनीवासीयांनी केली आहे.
या कॉलनी निर्मितीला जवळपास ३० वर्ष झाली असून शहर विकासासाठी लागणारा नगरपालीकेचा कर नागरिक हे दरवर्षी नियमित भरतात. अधिकारी व पदाधिकारी हे दरवर्षी आश्वासन देतात नागरिक मात्र विश्वास ठेवतात. या कॉलनी मधील रहिवासी हे सुज्ञ व जाणकार असुनही येथे नागरी सुविधा नाहीत. सुशिक्षित असून सहनशील असल्याने कदाचित ही गंभीर परिस्थिती दिसून येते.
साने गुरुजी जूना धरणगाव रोड ते विद्या नगर बोहरी हास्पिटल पर्यंत चा रस्ता हा धोकेदायक अपघातास आमंत्रण देणारा झाला आहे, दुचाकी, चारचाकी वाहने तर सोडाच पायी चालणे ही अवघड झाले आहे. शाळेत जाणारी मुले, दैनंदिन कामासाठी जाणारी नागरिक व‌ अत्यावश्यक प्रवास करणारे जेष्ठ नागरिक सारे वैतागले असून अतिशय वाईट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.विशेष म्हणजे हा रस्ता एरंडोल शहर ते साई नगर ,आनंद नगर,गुरुकुल कॉलनी यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे तरी सुद्धा प्राधान्य क्रमाने या रस्त्याचे काम नगरपालिकेने अद्याप केले नाही मात्र 30 वर्ष जुनी कॉलनी सोडून अलिकडच्या वसाहती मध्ये रस्ता व सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली हे नगरपालिकेचे अयोग्य धोरण दिसून येते.येथे बरेचदा पडल्यामुळे शारिरीक दुखापत झाल्या आहेत. येथे अद्याप गटारी नाहीत, रस्ते नाहीत,त्यात भर म्हणजे नगर पलिका टाकत असलेली नविन पाईपलाईन. पावसापुर्वी काम सुरु करून अद्याप ही अपुर्ण अवस्थेत आहे. पाईपलाईन मुळे रस्त्यावर काळी माती आली त्यामुळे रस्त्याची अवस्था कधी नाही एवढी वाईट झाली. त्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत. नगरपालिका मात्र झोपेचे सोंग घेत आहे. नगरपालिका ही मनमानी कारभार करत असल्याची भावना दिसून येत आहे .नगरपालिका आधिकारी कधीही हे जाणून घेणे गरजेचे आहे असे समजत नाहीत, प्रत्यक्ष भेट देवू न पाहणी करतील असे अधिकारी शोधून सापडत नाहीत. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे
त्यामुळे या परीसर नगरपालीकेमधून स्वतंत्र करून ग्राम पंचायत अस्तित्वात आणावी अशी मागणी मौर्य क्रांती संघाकडून व रहीवासी यांचे कडून करण्यात आली आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!