महसूलदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करुन महसूल दिन साजरा….. !
प्रतिनिधी -एरंडोल तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाने दि. २४ जूलै २०२४अन्वये पारित केलेल्या सूचने नुसार १ ऑगस्ट २०२४ हा “महसूल दिन” व दि १ ते १५ ऑगस्ट दरम्यान “महसूल पंधरवाडा-२०२४ ” साजरा करण्यात येणार असल्याने तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी , निवासी तहसीलदार संजय धुतले , नायब तहसीलदार दिलीप पाटील समवेत तहसील कार्यालयातील भूषण म्हस्के, सलमान तडवी, रोहित इंगळे, नितीन पाटील, श्रीमती लोंढे, भरत अहिरे, जितेंद्र बडगुजर, सुयोग कुळकर्णी, ऋषिप्रसाद पोळ, जगदीश धमाळे, मनोज पाटील, विशाल सोनार, उमेश पाटील, संदीप लहासे , अनिल सुरवाडे, निलेश पाटील, विजय कोळी, पार्थ यादव, कुळकर्णी, संदीप पाटील, अमोल पाटील आदी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून आपल्या सर्व सहकार्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.