एरंडोल येथील प्रांताधिकारी यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान.
प्रतिनिधी – एरंडोल प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दि.१५ रोजी महसूल पंधरवाड्याच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमात एरंडोल उपविभागाचे प्रांत मनीषकुमार गायकवाड यांचा उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी-बांधकाम परवानगी या श्रेणीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच एरंडोल प्रांत कार्यालयाने,”स्वच्छ व सुंदर कार्यालय” या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेसाठी नायाब तहसीलदार प्रवीण भिरुड,अव्वल कारकून देवेंद्र कोळी, संगणक ऑपरेटर ऋषीकेश जोशी, शिपाई आनंदा नेरपगार व महेश जोशी, कोतवाल शेखर ठाकूर यांनी परिश्रम घेतले. यासाठी कार्यालयाची स्वच्छता, रंगरंगोटी तसेच अभिलेख कक्ष निर्मीती, नागरिकांना बसण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली. या पुरस्काराबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एरंडोल प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.