एरंडोल नगरपरिषदेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा…
प्रतिनिधी एरंडोल:- येथे नगरपरिषद कार्यालयात राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयात थोर व्यक्ती व राष्ट्र पुरुष यांची जयंती साजरी करणे या कार्यक्रमांतर्गत या वर्षापासून महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आज ५ ऑगस्ट रोजी तिथीनुसार साजरा करण्यात आला. यावेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, कार्यालयीन अधीक्षक विनोद पाटील यांनी स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी प्रभाकर सोनार, प्रमोद पाटील, अशोक मोरे, प्रकाश सूर्यवंशी, रघुनाथ महाजन, तुषार शिंपी, संदीप शिंपी, वैभव पाटील, रेखाबाई महाजन, कैलास देशमुख, राजू वंजारी, भरत महाजन यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी व महानुभाव पंथीय वासनिक उपस्थित होते….