डीडीएस पीमहाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या दोन विद्यार्थिनींची राज्य स्तरीय म. गांधी विचार शिबिरासाठी निवड .
प्रतिनिधी एरंडोल – येथील दि.शं. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या दोन विद्यार्थिनींची त्यात अनुक्रमे कु. प्राची शिवदे आणि कु. पूनम ठाकूर यांची सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून निवडलेल्या ३० विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्य स्तरीय महात्मा गांधी विचार अभ्यास शिबीरासाठी निवड झाली.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. ए. जे. पाटील, विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र तायडे., शिफारस कर्ते गांधी विचार समिती जामनेरचे अध्यक्ष डॉ. नितीन दांडेकर, इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. हेमंत पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक या सर्वाकडून अभिनंदन केले जात असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.