पहिल्या दिवशी एरंडोल मध्ये दोन नामनिर्देशन पत्र दाखल….!
एरंडोल – एरंडोल विधानसभा मतदारसंघात मंगळवारी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिल्याच दिवशी एक राजकीय पक्षातर्फे तर दुसरा अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली.अशाप्रकारे पहिल्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटातर्फे अमोल चिमणराव पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.तर दत्तू रंगराव पाटील ( आडगाव ) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.दरम्यान १५ व्यक्तींनी मंगळवार अखेर ३४ नामनिर्देशन पत्र विकत घेतल्याचे सांगण्यात आले.