ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला यांचा सिने अभिनेता विजय पाटकर यांच्या हस्ते “खानदेश गौरव” २०२४ पुरस्काराने सन्मान होणार
प्रतिनिधी – येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला यांनी वकीली क्षेत्रात ४० वर्षाहून अधिक काळ आपल्या कार्याने गाजवला असल्याने त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने सप्तरंग मराठी चॅनल यांच्यातर्फे खानदेशातील कला , क्रीडा , शिक्षण , सामाजिक , सांस्कृतिक , वकिली , पत्रकारिता , पोलीस दल , व्यवसायिक , वैद्यकीय अशा क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांचा “खानदेश गौरव” २०२४ पुरस्काराने सिने अभिनेता विजय पाटकर यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे सन्मान करण्यात येणार असल्याने ॲड. शुक्ला यांना सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व मित्रमंडळींनी अभिनंदनचा वर्षाव केला असून सर्वत्र कौतुक होत आहे.