कासोदा येथे १ कोटी ४५ लाख रुपयाची रक्कम जप्त
“जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही रात्री उशिरापर्यंत चौकशी
प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील कासोदा येथे फरकांडे फाट्याजवळ नाकाबंदी करत असताना ,एक चार चाकी, पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कार मध्ये १ कोटी ४५ लाख रुपयाची रक्कम आढळून आली .सध्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असताना त्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.श्री महेश्वर रेड्डी यांनी ऑपरेशन ऑल आउट किंवा नाकाबंदी करणे संदर्भात आदेश केलेले होते. त्या अंतर्गत कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री निलेश राजपूत यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी नाकाबंदी करत असताना एरंडोल कडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी थांबविली,असता त्यात ५०० व १०० रुपयाच्या नोटा मिळून आल्या ,त्या नोटांची एकूण रक्कम १ कोटी ४५ लाख एवढे मिळाले असून, त्यावर कार्यवाही करण्यात आली.
आचारसंहिता अंतर्गत नाकाबंदी करून पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने कासोदा पोलीस स्टेशन अंतर्गत फरकांडे फाट्याजवळ नाकाबंदी करत असताना एरंडोल कडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीची तपासणी केली असता, त्यात १ कोटी ४५ लाख रुपये मिळाले. सदर वाहन कासोदा पोलीस स्टेशनला आणून त्यावर कार्यवाही करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार ,इन्कम टॅक्स विभाग व एस पी साहेबांच्या मार्गदर्शनात सदर कार्यवाही करण्यात आली. व जप्त केलेले रक्कम ट्रेझरी ला जमा करण्यात आली .
रात्री उशिरापर्यंत कार्यवाही
संध्याकाळच्या वेळेस प्रत्येक गाडीची तपासणी करत असताना ,पैसे असलेल्या चार चाकी ची तपासणी केली. त्यात मोठी रक्कम मिळाली. एरंडोल तालुक्यात व कासोदा परिसरात एवढी मोठी कार्यवाही पहिल्यांदाच घडली .सदर कार्यवाहीमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सदर पैसे हे कापूस जिनिंग मालकाचे असल्याची चर्चा आहे. सर्व तपासा अंती हे पैसे कुणाचे हे सिद्ध होईलच? मात्र सदर कार्यवाहीची परिसरात जोरदार चर्चा आहे.
या कार्यवाही प्रसंगी कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनी श्री निलेश राजपूत, जी पी एस आय सहदेव घुले, एएसआय रामकृष्ण पाटील , एच सी नंदलाल परदेशी, पी एन अकिल मुजावर, पी.सी नरेंद्र गजरे ,पीसी लहू हटकर, पी.सी समाधान तोंडे, पीसी ब्राह्मणे उपस्थित होते .पुढील कार्यवाही सुरू आहे.