३ बंडखोरासह ७ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात……!
१२०० पोस्टल व १७३ घरून करणार मतदान….!
प्रतिनिधी – एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणुकीच्या रिंगणात ३ बंडखोर ७ अपक्ष व ३ अधिकृत पक्षांचे उमेदवार असे एकूण १३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत .
अपक्षांना कोणास कोणते चिन्ह दिले याबद्दल पत्रकार परिषद घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी मनीष गायकवाड व सहाय्यक मतदान अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती दिली.
एरंडोल येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी तहसीलदार प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एरंडोल विधानसभा मतदारसंघात माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २० उमेदवारापैकी १३ उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे सांगून मतदार संघातील २९८ बुथ वरती सुसज्ज यंत्रणा असल्याबाबत मतदारांसाठी निवडणूक केंद्रावर मेडिकल किड्स,उन्हापासून बचावासाठी व मतदारांना बसण्यासाठी पूर्ण यंत्रणा सज्ज झाली.असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले.यात पारोळा तालुक्यातील करमाळा हे मतदार संघात सर्वात लांबचे मतदान केंद्र असल्याचे देखील पत्रकारांना सांगितले.
मतदार संघात पक्षांच्या उमेदवारासह अपक्षांचे देखील कस लागतील अशा मतदारसंघात चर्चा आहे. बंडखोरांची मनधरणी करून त्यांना निवडणूक रिंगणात येण्यापासून राष्ट्रीय पक्षाचे रोखण्याचे प्रयत्न असफल झाल्याची चर्चांना देखील मतदार संघात उधाण आले आहे.बंडखोरी ही महायुतीच्या दोन उमेदवारांनी केले आहे तर महाविकास आघाडीचा एक बंडखोर रिंगणात आहे तसेच डॉ. सतीश भास्करराव पाटील (रा.काॅ. शरद पवार गट )यांना तुतारी वाजवणारा माणूस, पाटील अमोल चिमणराव (शिंदे गट) यांना धनुष्यबाण , इंजि. प्रशांत दिनकर पाटील (स्वाभिमानी पक्ष ) यांना ऑटो रिक्षा , अमित राजेंद्र पाटील अपक्ष प्रोमपेट , अरुण रोहिदास जगताप (न्हावी ) अपक्ष मनुष्य व शिड युक्त नाव , अण्णासाहेब सतीश भास्करराव पवार ( पाटील) अपक्ष टेथस्कोप दत्तू रामराव पाटील अपक्ष पेंडयुलम,ए.टी.नाना पाटील ऊस शेतकरी,भगवान आसाराम पाटील ( महाजन ) अपक्ष शिट्टी , सुनील रमेश मोरे अपक्ष प्रेशर कुकर , डॉ. संभाजीराजे आर.पाटील अपक्ष गॅस सिलेंडर, इंजि. स्वप्निल भगवान पाटील अपक्ष एअर कंडिशनर , डॉ. हर्षल मनोहर माने ( पाटील ) बॅट अशाप्रकारे उमेदवारांना चिन्ह मिळालेले आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांना आपले चिन्ह रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी सारखे दिसणारे नवसाधरम्यामुळे ट्रंपेट या चिन्हांनी गोंधळ केल्याचे दिसून आले होते. दरम्यान या निवडणुकीत विधानसभेत याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.