कु. वैष्णवी दीदी कापडणेकर या कीर्तनकार झाल्या.
कापडणे प्रतिनिधी –
महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे धुळे नंदुरबार जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जिवराम महाराज यांची कन्या कु. वैष्णवी दीदी कापडणे कर या कीर्तनकार झाल्या. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गणेश माळी सर यांनी सांगितले, की महाराष्ट्र म्हटला म्हणजे संतांची भूमी आहे या भूमीवर अनेक संत निर्माण झाले संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत जगनाडे महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत रोहिदास महाराज, संत गोरोबा काका, संत एकनाथ महाराज,सखुबाई, मुक्ताबाई या संतांनी आपापल्या परीने आपल्या समाजात सामाजिक सुधारणा केली. अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचे काम संतांनी केले. तसेच संतांनी सांगितले आहे की परमार्थ करायचा असेल तर तारुण्यात करा.
ज्ञानेश्वर माऊलींनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. तसे आमच्या वैष्णवी दीदी अकराव्या वर्षी कीर्तनकार झाल्या. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे सेवा किसी की भी करो लेकिन किसी से आशा मत रखो, आशा पुरी करने वाला इंसान नही बल्की भगवान होता है. अशा प्रत्येक ठिकाणी समाजात जर वैष्णवी दीदी निर्माण झाल्या तर आपल्या महाराष्ट्राची, देशाची संस्कृती टिकून राहील असे मनोगत व्यक्त करण्यात आले.
कु. वैष्णवी दिदी यांनी ज्ञानाई वारकरी मुलींची शिक्षण संस्था आळंदी येथे प्रशिक्षण घेतले. सध्या तु.ता. खलाणे महाजन हायस्कूल धुळे येथे शालेय शिक्षण सुरू आहे.
या सत्कार प्रसंगी भागवत सेवा समितीचे अध्यक्ष बापूसो विश्वास बापू माळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी माळी, मुकनायकचे पत्रकार दिपक माळी धर्मा माळी आबा माळी हे उपस्थित होते.