रा.ति.काबरे विद्यालयात ५०वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन…..
एरंडोल:-येथील रा.ति काबरे विद्यालयात ५० वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक गटातून ८०, माध्यमिक गटातून ३८ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. प्राथमिक गटातून प्रथम हर्षल देशमुख (रा.ती. काबरे विद्यालय) द्वितीय राज सोनवणे (जिजामाता विद्यालय) तृतीय क्रमांक हर्षल दुबे (के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल) तर माध्यमिक गटातून हर्ष पाटील (लिटल व्हॅली स्कूल) द्वितीय क्रमांक कार्तिक पाटील (सम्यक इंग्लिश मीडियम स्कूल), तृतीय क्रमांक रोहित बेलदार , तसेच प्राथमिक शिक्षक गटातून मनोहर माळे,(उत्राण), माध्यमिक शिक्षक गटातून राहुल पाटील, (एरंडोल) प्रयोगशाळा परिचारक गटातून रवींद्र अहिरे .(विखरण) विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यश संपादन केले
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, शालेय पोषण आहार अधीक्षक जे डी पाटील , यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजेंद्र पाटील तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, मुख्याध्यापिका रोहिणी मानधने, विज्ञान तालुका समन्वयक अमोल वाणी, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन यांनी केले.सूत्रसंचालन शारदा सूर्यवंशी, दीपा काबरे यांनी केले.
तर प्रा.आर एम पाटील, प्रा.जयश्री देशमुख, प्रा.योजना देसले, यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण केले .
विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते यशस्वी लहान व युवा वैज्ञानिकांना बक्षीस देण्यात आली. उपमुख्याध्यापिका एस ए पाटील,
उपस्थित होते.
शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी आर सी मधील सर्व कर्मचारी वृंद. तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले.