पतंगाचा दोरा भिंगरीत गुंडाळत उलट्या पावली जातांना विहिरीत पडून मुलांचा मृत्यू….
एरंडोल प्रतिनिधी – धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे मकर संक्रांति निमित्त पतंग उडवत असताना अक्षय संजय महाजन वय वर्षे १४ पतंगाचा दोरा हा भिंगरी मध्ये गोळा करत असताना उलट्या दिशेने येत होता. त्यावेळेस गावालगत असलेल्या विहिरीत पडला. त्याला गावातील लोकांनी लगेच बाहेर काढून पुढील उपचारासाठी कल्पना हॉस्पिटल येथे आणले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.
तो कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता ते मूळचे रहिवासी कळमसरे येथील असून त्याचे वडील हे सासरी लग्नापासूनच राहत होते संजय महाजन हे शेती करून उदरनिर्वाह करत होते त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे