एरंडोल लाईव्ह न्युज या वेब पोर्टल चे उद्घाटन
एरंडोल- ख्यातनाम विधीज्ञ मोहन बी शुक्ला यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी बी एस चौधरीसर पत्रकार संघाचे अध्यक्ष हे होते. यावेळी उद्घाटक एडवोकेट मोहन शुक्ला यांनी एरंडोल लाईव्ह न्यूज पोर्टलला शुभेच्छा देत सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपावी व त्यातून समाजपयोगी कार्य करावे असे आवाहन केले. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आपल्या सेवेत सहभागी होत आहोत.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या लाईव्ह न्युज वर यापुढे असेच प्रेम व्यक्त करून आम्हाला सहकार्य करावे असा विश्वास आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी एस चौधरीसर हे होते याप्रसंगी प्रास्ताविक संपादक नितीन ठक्कर यांनी केले आभार प्रदर्शन राजधर महाजन यांनी केले सूत्रसंचालन शहराध्यक्ष कैलास महाजन यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांनी न्यूज चॅनलला शुभेच्छासह मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मा. नगरसेवक कुणाल महाजन, पंकज महाजन, सुधीर शिरसाठ,दिपक बाविस्कर,प्रविण महाजन, नितीन पाटील, कुंदन सिंह ठाकुर, उमेश महाजन, संजय पाटील, प्रमोद चौधरी,अन्वर अहमद ,संजय बागड , शैलेश चौधरी, विक्की खोकरे, सुनील ठाकूर,अरुण पाटील, संदीप महाजन, प्रल्हाद महाजन, विकास पिंगळे, गणेश महाजन, मच्छिंद्र महाजन, उपस्थित होते.