तांग सु डो कराटे नॅशनल
चॅम्पियनशीप व कुस्ती मध्ये
रा.ती.काबरे विद्यालयचे विद्यार्थी, विद्यार्थिनीचे सुयश
एरंडोल/नितिन ठक्कर – येथील रा.ती.काबरे विद्यालयचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ४ जानेवारी ते ६ जानेवारी दिल्ली येथे पार पडलेल्या तांग सु डो कराटे नॅशनल चॅम्पियनशीप मध्ये दुर्गेश किरण पाटील याने २ रौप्य पदक, वेदांत दुर्गेश लढे १ कांस्य पदक, जान्हवी ज्ञानेश्वर महाजन १ रौप्य व १कांस्य पदक जिंकून घवघवीत यश संपादन केले. तसेच भगूर जि. नाशिक येथे यामिनी भानुदास आरखे हिने १४ वर्षीय वयोगटातील ४६ किलो वजन गटात विभाग स्तरावर विजयी होऊन राज्य स्तरावर निवड झाली.
या यशाबद्दल रा.ती.काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी मानूधने व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.