राज्यस्तरीय इंग्रजी विषय सिम्पोझियम करिता माध्यमिक गटातून भरत शिरसाठ यांची निवड….
एरंडोल/ राजधर महाजन :- प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद यांचे मार्फत राज्यस्तरीय इंग्रजी विषय सिंपोजियम चे आयोजन मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी २० जानेवारी रोजी करण्यात आले आहे. सदर सिंपोजियम करिता जिल्ह्यातून प्राथमिक गटातून तीन आणि माध्यमिक गटातून एका शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण तालुका एरंडोल येथील इंग्रजी विषय शिक्षक भरत आत्माराम शिरसाठ यांची माध्यमिक गटातून सदर राज्यस्तरीय सिंपोजियम करीता निवड करण्यात आली आहे.
इनोव्हेशन्स इन इंग्लिश लैंग्वेज एज्युकेशन या विषयावर ते सदर सिंपोजेम मध्ये पोस्टर प्रेसेंटेशन करणार आहेत. सदर सादरीकरणाकरिता डायट जळगावचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे व इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर विद्या बोरसे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. श्री. भरत शिरसाठ हे इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन जळगाव चे अध्यक्ष असून एससीईआरटी वरिष्ठ व निवड श्रेणी राज्य तज्ञ गटाचे ते सदस्य आहेत. इंडिया -बांगलादेश टेलीकोलाबोरेशन प्रोजेक्टचे ते जिल्हा समन्वयक होते. तसेच इंग्रजी विषय चेस प्रोजेक्टचे जिल्हा एमइआर आहेत.