डी. डी. एस. पी. महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा शुभारंभ.‌‌.‌…

IMG-20230119-WA0123.jpg

एरंडोल:-येथे डी. डी. एस. पी महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचे उद्घाटन बेंडाळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अमित पाटील हे होते.
प्रास्ताविक डॉ. स्वाती शेलार यांनी केले, पायल कलाल, व देवयानी पाटील यांनी सूत्रसंचालन केले अश्विनी पाटील गायत्री पाटील यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले निकिता सैंदाणे हिने आभार प्रदर्शन केले
विद्यापीठाने आत्मनिर्भर युती अभियानाचा उपक्रम जो राबविला आहे तो अतिशय स्तुत्य असून त्याचा लाभ युवतीने नक्की घेतला पाहिजे महाविद्यालयाने या सोयी सुविधा मुलींना उपलब्ध करून दिले आहेत त्यांचा वापर केला पाहिजे असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी अध्यक्ष भाषणातून केले
प्राचार्य एन. ए. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, डॉ. हेमंत पाटील, युवती सभासचिव डॉ. स्वाती शेलार, डॉ. मीना काळे, डॉ. रेखा साळुंखे, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ. सविता पाटील व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Author

You may have missed

error: Content is protected !!