जनमाहिती अधिकारी यांनी लोकाभिमूख दृष्टीकोन ठेवावा – सुभाष बसवेकर……..
खालापूर (रायगड) माहितीचा अधिकार कायद्यामध्ये जनमाहिती अधिकारी यांची भूमिका खूपच महत्त्वपूर्ण आहे. जनमाहिती अधिकारी यांनी माहिती देताना खूपच सकारात्मक व लोकाभिमूख दृष्टीकोन ठेवून कार्य करणे व पदाला न्याय देणे अपेक्षित आहे.पारदर्शक प्रशासनासाठी हे अत्यंत अवाश्यक आहे. परंतु हल्ली जनमाहिती अधिकारी यांचा माहिती देण्याऐवजी माहिती नाकारण्याकडे अधिक कल वाढला असल्याचे दिसून येत असून हे लोकशाही व नागरिकांचे हक्क यांच्यासाठी मारक आहे.असे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले. ते दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी पंचायत समिती कार्यालय खालापूर तालुका येथे ग्रामसेवकांसाठी माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक विस्तार अधिकारी श्री. महादेव शिंदे साहेब यांनी ग्रामसेवकांना माहित अधिकार कायद्याचे प्रशिक्षण मिळून त्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करता यावी म्हणून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले तर गावकरी व शासन यातील दूवा असणारा ग्रामसेवक हा ग्रामीण विकासाचा अग्रदूत असल्याचे प्रतिपादन कार्यशाळेचे समन्वयक श्री.वसंत पाटील यांनी केले.
या कार्यशाळेसाठी समाजसेवक राजेद्र पाटील यांच्यासह तालुक्यातील ३९ ग्रामसेवक उपस्थित होते.