दि.शं पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची एरंडोल पोलीस स्टेशन ला क्षेत्रभेट

IMG-20230120-WA0113.jpg

एरंडोल प्रतिनिधी – दि. १९ जानेवारी २०२३ रोजी  दि.शं. पाटील महाविद्यालयातील  विद्यार्थीनींसाठी युवती सभा मंचातर्फे  आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत एरंडोल पोलिस स्टेशनला  भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनीना पोलिस स्टेशन च्या कामकाजाची माहिती मिळावी, पोलिस स्टेशन विषय मुलींच्या मनातील भीती दूर व्हावी, तक्रार नोंदवतांना कोणती खबरदारी घ्यावी, पोलिस विभाग सर्वसामान्य जनतेचा संरक्षणासाठी  कोणकोणते कार्य करते याची माहिती मिळावी या उद्देशाने या क्षेत्र भेटीचे   आयोजन करण्यात आले होते.
           यावेळी एरंडोल पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक     ज्ञानेश्वर जाधव यांनी मुलिंच्या मनामध्ये असलेल्या शंकांचे निरसन केले. तसेच त्यांना मिळालेले स्टार कशासाठी आहे याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले. महिला अटक करण्यासाठी कोण-कोणते  नियम व कायदे आहे. या विषयाची  विद्यार्थिनीनी माहिती करून घेतली.
        विद्यार्थीनिनी अमंलदार कक्ष, बिनतारी संदेश कक्ष, गुन्हे अन्वेषण कक्ष ,  संगणक कक्ष, पुरुष कस्टडी, महिला कस्टडी, मुद्देमाल कक्ष या वेगवेगळ्या  विभागाची माहिती करुन घेतली. या वेळी  मिलींद कुमावत, संदीप पाटिल यांनी विद्यार्थिनीना संपूर्ण विभागाची सविस्तर माहिती दिली. पोलिस निरीक्षक  ज्ञानेश्वर जाधव, उप निरीक्षक शरद बागल , काशीनाथ पाटिल, राजेश पाटिल, अनिल पाटिल यानी अनमोल सहकार्य केले. या क्षेत्रभेटीचा लाभ महाविद्यालयातील ९० विद्यार्थिनिंनी घेतला. या क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ हेमंत पाटिल, युवती सभा सचिव डॉ स्वाति शेलार युवती सभा सदस्य डॉ मीना काळे,डॉ. रेखा साळुंखे, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ  सविता पाटिल प्राध्यापिका मनीषा बाविस्कर यानी विशेष परिश्रम घेतले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!