विनयभंग करणाऱ्या तरुणाला सुनावली शिक्षा…..

images.jpeg

जळगाव तालुक्यातील एका गावातील
महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला जळगाव जिल्हा न्यायालयाने  शिक्षा  केली आहे आणि ३ हजाराचा दंड अशी शिक्षा २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव , तालुक्यातील एका गावात ४० वर्ष पासुन महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला राहत होती गावातील राहणारा विलास जुलाल भिल (वय २५) याने २१ मे २०१४ रोजी विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात  फिर्यादीवरून विलास भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे हे करीत होते. प्रकरणी २ डिसेंबर रोजी न्यायमुर्ती पी.आर. वागडोळे यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र जळगाव जिल्हा न्यायालयात
दाखल करण्यात आले. या प्रकरणात  १० साक्षिदार तपासण्यात आले. पिडीत महिला, तिचे पती, गावातील व्यक्ती आणि तपासाधिकारी  निरीक्षक  अहिरे यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षी व पुराव्याअंती न्यायालयाने विलास जुलाल भिल याला दोष ठरवत ६ महिन्याची शिक्षा आणि 3 हजार रूपयांची दंड अशी शिक्षा  २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे. यासाठी  अधिकारी पो. कॉ. भगवान आरेख आणि विलास पाटील यांनी काम पाहिले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!