लाचखोर कोतवाल एसीबीच्या जाळ्यात…
देहगांव येथील मंडळ अधिकारी कार्यालय परिसरात लाच घेतांना कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले पाच दिवस अगोदर नैताळे येथे ग्रामसेवक आणि इतर खासगी व्यक्तींना लाच घेताना पकडले लगेच दुसरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराच्या निफाड तालुक्यातील दहेगाव येथील वडिलोपार्जित शेतजमिनीचे खाते वाटप आदेश निफाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाले होते. त्या आदेशाची नोंद मंजूर करण्यासाठी कोतवाल लक्ष्मण छ वैराळ यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा झाली असता (दि.25) रोजी सापळा लावण्यात आला. तडजोडीअंती तीन हजार रुपये स्विकारताना वैराळ यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. व लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने कारवाई केली.