एरंडोल तालुक्यात अनेक ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात साजरा

IMG-20230126-WA0145.jpg

एरंडोल-  धारागीर ता. एरंडोल येथील जिल्हा परिषद शाळेत श्रीमती शोभाताई अशोकराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.                      धारागीर येथील प्राथमिक शिक्षिका शितल अशोक पाटील व प्राथमिक शिक्षक नयन अशोक पाटील यांच्या मातोश्री यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्रीमती शोभाताई पाटील यांच्याकडून बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांनी सर्वांचे आभार मानले.
     एरंडोल येथे महात्मा फुले हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त चेअरमन अरुण माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, रवींद्र महाजन, सुदर्शन महाजन, दुर्गादास महाजन, जयराम माळी व इतर मान्यवर उपस्थित होते.
       यावेळी शालेय विद्यार्थिनी स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध कलागुणांचे प्रदर्शन सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विनोद जाधव, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!