एरंडोल: शहरासह तालुक्यात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण उत्साहात संपन्न
एरंडोल:-येथे शहरात व तालुक्यात ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या हस्ते प्रांत कार्यालयात करण्यात आले तसेच तहसील कार्यालयात तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील डी डी एस पी महाविद्यालयात संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रा.ती काबरे विद्यालयात मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालया मार्फत सूर्यभित्तीपत्रिकेचे उद्घाटन उपमुख्याध्यापिका शोभा पाटील व जयश्री कुलकर्णी यांनी केले.महात्मा फुले हायस्कूल येथे संस्थेचे चेअरमन अरुण माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तालुक्यातील धारागीर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये श्रीमती शोभा अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान शहरात व तालुक्यात काही ठिकाणी भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले शहरात कॉलनी परिसरात भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले.
तसेच रा.ति काबरे विद्यालयाच्या पटांगणावर पोलीस संचालन, एनसीसी, आर एस पी, स्काऊट गाईड, याचे पतसंंचालन होऊन विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली.