बचत गट व शेतकऱ्यांना परसबाकी खेती पुस्तिकेचे वाटप.
एरंडोल – तालुक्यातील प्रिंपी बुद्रुक येथे हवामान नकुल अल्पखर्ची शाश्वत शेती तंत्रज्ञान अभियाना अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी सरपंच केला सोनवणे होते व्यासपीठावर संजय पाटील गणेश ठाकरे जयश्री पाटील रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्र जळगाव चे विषय तज्ञ डॉक्टर स्वाती कदम यांनी सांगितले की बदलते हवामान अनुसार शेती क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे शेतकऱ्यांनी दरवर्षी जमिनीशी मशागत वीजप्रक्रिया पाणी व कीड व्यवस्थापन पीक पद्धती या गोष्टींवर ही भर दिल्यास निश्चितच उत्पन्नाची हमी मिळेल
डॉ तुषार गोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृषी सहायक कुंदन पाटील यांनी प्रस्तावित केले सूत्रसंचालन नितीन नेरकर यांनी केले आभार प्रदर्शन कृष्णा पाटील यांनी केले भूषण वाघ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले मेळाव्याच्या यशस्वी साठी प्रकल्प अधिकारी शांताराम शाकोरे व राहुल पाटोळे यांनी परिश्रम घेतले