५००० रूपयाच्या लाचेसाठी त्याने लावली नोकरीची बोली
चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशन हद्दीमधुन जर वाळु वाहतुक करायची असेल तर तुला पाच हजार द्यावे लागतील अन्यथा तुला वाळुची वाहतुक करु देणार नाही. वाळूचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्थानकात पंटरला जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कॉन्स्टेबल योगेश गोसावी व खाजगी चंद्रकांत कोळी होमगार्ड असे संशयितांची नावे आहेत. तक्रारदार यांनी कर्जाद्वारे ट्रॅक्टर घेतले होते.
ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयित पोलीस अमलदार योगेश गोसावी यांनी पाच हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीनंतर सापळा रचला. त्यानंतर अडावद पोलीस स्थानकाच्या आवारातच खाजगी पंटरने लाच स्वीकारताच गोसावी यांनाही ताब्यात घेण्यात आले.
सापळा पथक शशिकांत पाटील पोलीस उपअधीक्षक ला प्रवीण जळगाव पो.ना. ईश्वर धनगर पो.कॉ. राकेश दुसाने सदर कारवाई करणारे पथक स.फौ.दिनेश पाटील स.फौ. सुरेश पाटील पो.हे.कॉ. सुनील पाटील पो.हे.कॉ. रवींद्र घुगे म.पो.हे. शैला धनगर पो.ना. किशोर महाजन पो.ना.सुनील वानखेडे पो.कॉ. प्रदीप पो.कॉ.सचिन चाटे पो.कॉ प्रणेस ठाकूर आदीं सदर कारवाई केली.