एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट करून देण्याच्या नावाखाली फसवणूक

Screenshot_2023-01-29-20-00-00-78_680d03679600f7af0b4c700c6b270fe7.jpg

मुंबई : महिला शिक्षिकेला  तिचे एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट  करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करून तिच्या खात्यातून लाखो रुपये काढणाऱ्या दोघांना मालाड पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे . विशेष म्हणजे दोघेही आरोपी आरोपी बँकेत ग्राहक म्हणून उभे राहतात , संधी पाहून ते ज्येष्ठ नागरिकाला मदतीच्या नावाखाली दुसऱ्या एटीएम केंद्रात घेऊन जातात त्यांची फसवणूक करून पळून जातात अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे . त्याचबरोबर मालाड व्यतिरिक्त इतर अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींविरुद्ध ५ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत . फसवणूक केलेल्या पैशातून दोघेही पब आणि लॉजमध्ये जाऊन मजा करायचे करायचे .
सेवानिवृत्त महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत . मालाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले की , तक्रारदार महिलेने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नवीन एटीएम कार्ड मागवले होते . नवीन एटीएम कार्ड घेऊन महिला बँकेत गेली . बँक कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड सक्रिय करण्यास सांगितले . बँकेचे कर्मचारी एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट करत असताना , याचदरम्यान आरोपी ग्राहक म्हणून बँकेच्या एटीएम मशीनजवळ उभा राहून महिलेच्या एटीएम कार्डचा पिन बघत होता . काही वेळाने एटीएम ॲक्टिव्हेट होत नसताना त्या गुंडाने महिलेला सांगितले की , दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये तुमचे कार्ड ॲक्टिव्हेट करुन देतो. त्यानंतर काळ्या – पिवळ्या टॅक्सीत महिलेला सोबत घेऊन काही अंतर गेल्यावर आणखी एक गुंडही त्या टॅक्सीत घुसला आणि दोघांनी मिळून महिलेला एटीएम सेंटरमध्ये नेले . तिथे एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट  केले  आणि महिलेच्या खात्यातून मूळ ॲक्टिव्हेटेड एटीएम कार्डने ४० हजार रुपये  काढून लगेचच  फरार झाले.  दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी ५ वेगवेगळ्या बँकांचे डमी एटीएम कार्ड , २ मोबाईल फोन , १५ हजारांची रोकड जप्त केली आहे .

About Author

You may have missed

error: Content is protected !!