मका खरेदी विक्री व्यवहारात आर्थिक फसवणूक….
धरणगाव न्यायालयाने दिले कारवाई करण्याचे आदेश….

20230130_181242-BlendCollage.jpg

एरंडोल प्रतिनिधी -धरणगाव येथील महावीर कॉटनचे भागीदार संजय समीरमल ओस्तवाल यांनी शुभम ट्रेडिंग मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक येथील राजेंद्र लुणावत व दिनेश कांतीलाल लुणावत यांच्यासोबत एप्रिल २०२० ते मार्च २०२२ पर्यंत एकूण ६८६७२४२/- रुपयांचा मका खरेदी विक्रीचा व्यवहार केला होता. त्यापोटी ३८,००,०००/- रु. बँकेमार्फत मिळाले उर्वरित रक्कम
३०,६७,२४२/- ही देण्यास टाळाटाळ करून आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे संजय समीरमल ओस्तवाल यांनी धरणगाव न्यायालयात या दोघांविरुद्ध खटला दाखल केला.
     धरणगाव न्यायालय भा.द.वि. ४१७,४१९,४२०,४०६,१२०,२०१  सह ३४ कलम नुसार दाखल केलेल्या खटल्यात धरणगाव पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दखलपात्र कलमाच्या अब्रा अपराधाबाबत रीतसर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करूनही कारवाई न झाल्यामुळे धरणगाव न्यायमूर्ती ए. ए. ढाके यांनी शुभम राजेंद्र लुणावत व दिनेश कांतीलाल लुणावत या दोघांविरुद्ध आर.पी.सी. कलम १५६८३ प्रमाणे कारवाई करण्याचे न्यायालयीन आदेश २५ जानेवारी २०२३ रोजी पारित केले. संजय समीर मल ओत्सवाल यांच्यातर्फे ॲड. मोहन बी. शुक्ला यांनी कामकाज पाहिले त्यांना ॲड. विलास मोरे,ॲड. सुजित पाठक यांनी सहकार्य केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!