एरंडोल पदवीधर संघासाठी एकूण ५६.५६ टक्के मतदान…
एरंडोल- महाराष्ट्र विधान परिषद एरंडोल निवडणूक पदवीधर शिक्षक मतदारसंघा साठी एकूण ५६.५६ टक्के मतदान झाले.
दरम्यान आज सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत एरंडोल तहसील कार्यालयाच्या तहसीलदार यांच्या व नायब तहसीलदार यांच्या दालनात एकूण दोन बुथ वर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बारा वाजे नंतर दोघं मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी उमेदवारांचे स्टॉल थाटले होते यावर अनेक मतदारांनी आपली नावे शोधण्यासाठी गर्दी केली होती.त्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून मतदान केंद्र व त्यांची नावे शोधून दिली.याप्रसंगी एरंडोल तहसील कार्यालयाचा तहसीलदार यांच्या दालनात व नायब तहसीलदार यांच्या दालनात बुथ क्रमांक ७७ वर एकूण ६३.९२ तर बुथ क्रमांक ७८वर ४३.६४
असे एकूण मतदान झाले तसेच एकूण ११०५ पैकी ६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात ४८२ पुरुष व १४३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणूक कामी पद निर्देशित सहाय्यक मतदान निवडणूक अधिकारी तहसीलदार सुचिता चव्हाण, मतदान केंद्र अधिकारी विकास नवाळे व एस.टि.मोरे, नायब तहसीलदार दिलीप पाटील, किशोर माळी, मनोहर राजेंद्र वैभव पाटील, तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. निवडणूक शांततेत पार पाडण्या कामी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बागल यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.