भीषण पाणीटंचाई पाणीपुरवठा होतो १५ दिवसाआड ग्रामस्थ पाण्यासाठी रानावनात…
एरंडोल/प्रतिनिधी एरंडोल :-तालुक्यातील विखरण या मोठ्या गावात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई तीव्रतेने जाणवत असून जवळपास महिन्यातून दोनदा पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे विखरण ग्रामस्थ पाण्यासाठी रानावनात भटकंती करीत आहेत दरम्यान पाणी प्रश्नावर विविध स्तरातील यंत्रणा उदासीन असल्याचा आरोप केला जात आहे या गावाची लोकसंख्या जवळपास आठ ते नऊ हजार आहे ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी प्रश्नावर वेळोवेळी यंत्रणांकडे निवेदने पाठवूनही या क्षणापर्यंत काही एक कार्यवाही झाली नाही. आता माजी जि प सदस्य यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पाणी प्रश्न निवेदन दिले आहे व विखरण गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
एरंडोल येथून तात्पुरती पाणीपुरवठा योजना विखरण गावासाठी सुरू करावी अशी मागणी नानाभाऊ महाजन यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून विखरण गावाला टंचाई काळात एरंडोल नगरपालिकेच्या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात आहे यंदाही नगरपालिका प्रशासनाने विखरणाचा पाणी प्रश्न युद्ध पातळीवरून सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.