एरंडोल महावितरणची पुनश्च वीज चोरी विरोधात धडक मोहीम…
एरंडोल/प्रतिनिधी: एरंडोल वीज महावितरण तर्फे ग्रामीण कक्षातील विखरण येथे वीज चोरी पकडण्याची धडक मोहीम १ फेब्रुवारी २०२३ रोजी राबविण्यात आली या मोहिमे अंतर्गत तीन रोहित्रांवरील भागातील एकूण १५२ घरगुती वीज जोडण्या तपासण्यात आल्या त्यात ३२ मीटर मध्ये वीज चोरी असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले ते मीटर टेस्टिंग साठी ताब्यात घेण्यात आले बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडी चा अनाधिकृत वीज वापर आढळून आला तसेच १३ विज जोडण्यांमध्ये मीटरला येणाऱ्या सर्विस वायरला टॅपिंग द्वारा विज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे एकूण ४५ वीज चोरी उघडकीस आणल्या.
जप्त करण्यात आलेल्या मीटरची मीटर टेस्टिंग युनिट येथे तपासणी करून विविध चोरीचे देयक सदर ग्राहकांना अदा करण्यात येतील. सदर वीज बिल न भरल्यास त्या ग्राहकांवर तात्काळ वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
कार्यकारी अभियंता धरणगाव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वात एरंडोल ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता लक्ष्मी माने प्रशांत महाजन राहुल पाटील युवराज तायडे इच्छानंद पाटील यांनी सदर मोहीम यशस्वीपणे पार पाडली.