एरंडोल सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल होणार गौरव
मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचे हस्ते उद्या सुर्या फाऊंडेशन जळगांवचा नोबल पुरस्कार-
एरंडोल ( प्रतिनिधी ) – जळगांव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात (धुळे-जळगांव-नंदूरबार) उल्लेखनिय कामगिरी करणार्या ज्येष्ठांना मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, नेत्ररोग तपासणी यासह विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणार्या एरंडोलच्या सुर्योदय ज्येष्ठ नागरी संघास यंदाचा सुर्या फाऊंडेशन जळगांवचा नोबल पुरस्कार जाहीर झाला असून उद्या ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाळधी ता. धरणगावं येथील श्रीसाई बाबा मंदिर पटांगणात सायंकाळी ६ वाजता सुप्रसिध्दी मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचे हस्ते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे. यापूर्वी देखील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्मानपत्र, दैनिक देशतूत यांचेतर्फे सन्मानपत्र, गौरव देण्यात आलेला आहे.
सुर्या फाऊंडेशन जळगांच्या अध्यक्षा अर्चनाताई सुर्यवंशी, स्वामी समर्थ गृप जळगांवच्या संचालिका प्रतिक्षाताई पाटील यांचेसह जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापौर जयश्री महाजन, शिक्षणाधिकारी विकास पाटील, पोलिस उपअधिक्षक चंद्रकांत गवळी, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, स्वामी समर्थ गृप अध्यक्ष मनोज पाटील, कॅन्सरतज्ञ निलेश चांडक, उद्योगपती शरद कासट, गोपाल कासट, डॉ. हर्षल माने, समाधान पाटील (उद्योगपती), प्रतापराव पाटील (जि. प. सदस्य), सरपंच लक्ष्मीबाई कोळी, अलका पाटील, उद्योगपती दिलीप पाटील, संजीव पाटील, मुकूंद नन्नवरे, अॅड. जमील देशपांडे, महानंदाताई पाटील, समाजसेविका सुधा काबरा आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.