कौटुंबिक न्यायालयात खावटीची तारीख वाढून मिळणे पडले महागात…

IMG-20230202-WA0036.jpg

एरंडोल- प्रतिनिधी जळगांव यातील तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यामध्ये कौटूंबीक वाद होते म्हणून तक्रारदार यांनी पत्नी विरुद्ध कौंटुंबीक न्यायालय,बी.जे मार्केट जळगाव येथे पत्नीने त्यांच्याकडे नांदावयास यावे म्हणून दावा दाखल केला आहे व पत्नीने देखील तक्रारदार यांचे विरुद्ध त्याच कौटुंबीक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. सदर दाव्यात कौटुंबीक न्यायलयाने तक्रारदार यांना ८५,०००/-रुपये एकरकमी खावटी रक्कम देण्याचा आदेश दिला असुन सदर खावटीची एकरकमी रक्कम जमा करणेकरीता तारीख वाढवून मिळवून देण्याच्या मोबदल्यात यातील तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे हेमंत दत्तात्रय बडगुजर, वय-५७, सहाय्यक अधीक्षक, कौटूंबीक न्यायालय, बी.जे.मार्केट,जळगाव
रा.इंद्रप्रस्थ नगर, शिवाजी नगर,जळगाव ता.जि .जळगाव .यांनी २००/-रुपये  लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केलेली रक्कम जळगाव बी.जे.मार्केट जळगाव येथील कौटुंबीक न्यायालयाच्या वरच्या माळ्यावरील गोविंदा कॅन्टीनजवळ पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!