जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख…
एरंडोल- प्रतिनिधी जळगाव, जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. प्रवेश परिक्षा अर्ज हे पुर्वीप्रमाणेच ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहे. या प्रक्रियेसाठी 8 फेब्रुवारी, 2023 ही अंतिम तारीख असून ही परीक्षा शनिवार 29 एप्रिल, 2023 ला जिल्हा शिक्षण विभागाने निर्धारीत केलेल्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत होईल.
या परीक्षेचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज लिंक www.navodaya.gov.in वर उपलब्ध आहेत.
सर्व संबंधीतांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचून चालू वर्षी इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी (अटी पुर्ण करणारे) या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबधीत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी यांनी आपल्या गटातील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ चे प्राचार्य, डॉ. आर. आर. खंडारे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी श्री. बी. आर. त्रिवेदी-7875404274/9422797110, जी. आर. सरनाईक-8208888537, कुमारी आयश्या एफ.सी.एस.ए-9588401451, शैलेन्द्र नागवंशी-8600675876 यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्राचार्य श्री. खंडारे यांनी कळविले आहे.