बंजी जंपिंग करताना कड्यावरुन उडी मारली आणि मध्येच दोर तुटला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ…
व्हिडिओ : सध्या बंजी जंपिंग पॅराग्लायडिंग स्कूबा डाइविंग या सांरख्या साहसी खेळांची क्रेज वाढत आहे.
हे खेळ खेळता सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जाते. मात्र, असे असताना बंजी जंपिंग करतान थरारक घटना घडला आहे. बंजी जंपिंग करताना कड्यावरुन उडी मारली आणि मध्येच दोर तुटते. काळजाचा ठोका चुकवणारा हा Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 12 लाख पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 15 हजार पेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर, या व्हिडिओवर 500 पेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/i/status/1621164034295996416
एका बंजी जंपिंग स्टेशनवरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेला क्लपनाही नव्हती की तिच्यासोबत काय घडणार आहे. ही महिला मोठ्या धाडसाने बंजी जंपिंग साठी तयार येते. बंजी जंपिंग स्टेशनवरचे गार्ड या महिलेला सेफ्टी बेल्ट बांधून बंजी जंपिंगसाठी तयार करतात. यानंतर ते तिला कड्यावरुन ढकलून देतात.
उंच कड्यावरुन थेट नदी पात्रात झेपावणाऱ्या बंजी जंपिंगचा थरार अनुभव या महिलेसाठी अत्यंत भयावह ठरला आहे. कारण या महिलेने बंजी जंपिंगसाठी कड्यावरुन खाली ठकलल्यानंतर महिला वाऱ्याच्या वेगाने नदी पात्राकडे झेपावते. मात्र, मध्येच बंजी जंपिंग करण्यासाठी महिलेला बांधण्यात आलेला सेफ्टी दोर तुटल्याचे व्हिडिओत दिसत आहे.