गरम पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? समजून घ्या यामागचं खरं कारण…
व्यस्ततेमुळे लाईफस्टाईलमध्ये लोकांना स्वत:कडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढत आहे. डायबिटीजप्रमाणेच कोलेस्ट्रोल वाढणं हे सुद्धा लाईफस्टाईलशी निगडीत आहे.
वेळीच लक्षणांकडे लक्ष न दिल्यास अंगावर वाईट प्रभाव दिसू शकतो. आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधांद्वारे यावर नियंत्रण ठेवता येते, परंतु जर तुम्हाला औषध घ्यायचे नसेल तर तुम्ही घरगुती उपायांनी ते नैसर्गिकरित्या नियंत्रित करू शकता. गरम पाण्याने कोलेस्ट्रॉलही कमी होते का? या समस्येवर गरम पाणी किती प्रभावी आहे ते जाणून घेऊया.
आरोग्य हेल्थ सेंटरचे आयुर्वेदाचार्य डॉ. एक के पांडे यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना सांगितलं, ”गरम पाणी प्यायल्यानं तुमचं शरीर डिटॉक्सीफाय होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येनं रक्तवाहिन्या लिपिड्सना चिकटलेल्या असतात. जास्त अन्हेल्दी फॅट्, तेलकट पदार्थांच्या सेवनानं शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि ब्लड सर्क्युलेशन, ब्लड प्रेशर प्रभावित होते. गरम पाणी ब्लड वेसल्समधील लिपिड्स कमी करण्यात फायदेशीर ठरतात. दीर्घकाळ गरम पाणी प्यायल्यानं कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
गरम पाणी ब्लड फ्लुएडला चालना देते. वास्तविक, तुमच्या रक्तात जितके जास्त द्रव कमी असेल तितकेतुमचे रक्त घट्ट होऊ शकते किंवा रक्त परिसंचरण प्रभावित होऊ शकते. अशा परिस्थितीत गरम पाणी प्यायल्याने रक्तातील द्रव वाढते आणि रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते.