नववधूच्या डोक्यावरचा पदर उचलताच सासरच्या मंडळींना बसला धक्का, नवरदेवाचा तर थेट आत्महत्येचा इशारा!

n4687159541675585797251e9b1aeaae2af4524883cd3d07c4aa3d80d4ee1b1239f1aae9b56b87ba6827c83.jpg

उत्तर प्रदेशच्या सम्बळ जिल्ह्यातील एका लग्नसोहळ्यात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. वधू पक्षानं आपल्या धाकट्या बहिणी ऐवजी थोरल्या बहिणीला लग्नाला डोक्यावर पदर घेऊन बसवलं असा आरोप वर पक्षाकडून करण्यात आला आहे.

लग्न सोहळा झाला अन् सासरी जेव्हा ‘मुंह दिखाई’चा विधी पार पडला तेव्हा वधूच्या डोक्यावरील पदर उचलताच सासरच्या मंडळींच्या पायाखालची जमिनच सरकली. वर पक्षाच्या कुटुंबीयांनी संतापाच्याभरात वधूला थेट तिच्या घरी धाडलं. आता नवरदेवानं तर आपल्याला न्याय न मिळाल्यास थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे.

घटना हजरत नगर गढीच्या पोलीस ठाणे हद्दीतील कटौली गावातील आहे. गावातील एका मुलीचा विवाह सोहळा २६ जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. घराण्यातील विधींनुसार वधूनं डोक्यावर पदर घेत चेहरा लपवला होता. सर्व विधींनुसार सात फेरे घेतेले आणि वर-वधूंनी साताजन्माची साथ देण्याचं वचन दिलं.

लग्न सोहळा पार पडल्यानंतर नवरदेव वरातीसह आपल्या गावी परतला. सासरच्या घरी आल्यानंतर परंपरेनुसार ‘मुंह दिखाई’चा विधी सुरू झाला. वर पक्षाकडील महिलांनी जेव्हा वधूच्या डोक्यावरील पदर वर केला तेव्हा उपस्थितांना मोठा धक्काच बसला.

वधूच्या कुटुंबीयांनी त्यांच्या धाटक्या बहिणी ऐवजी थोरल्या बहिणीचं लग्न लावून दिल्याचं वर पक्षाला कळलं. खरंतर वर पक्षानं धाटक्या बहिणीला पसंत केलं होतं. तशी बोलणीही झाली होती. पण लग्नाच्या दिवशी वधू पक्षाकडून थोरल्या बहिणीला लग्नासाठी उभं करण्यात आलं. बघता बघता ही घटना संपूर्ण गावात पसरली आणि सासरच्या मंडळींनी नववधूला तिच्या माहेरी पाठवलं. दोन्ही पक्षाच्या वादामुळे मोठा गदारोळ उडाला होता.

वधूची मानसिक स्थिती अस्थिर
वधू पक्षाकडून या घटनेबाबत वर पक्षाकडून वारंवार हुंडा मागितला जात होता म्हणून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होतं. तर वर पक्षानं वधू पक्षाकडून फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. वधू पक्षानं धाकटी बहिण दाखवून थोरल्या बहिणीसोबत लग्न लावून दिलं जिची मानसिक स्थिती ठिक नाही असा आरोप वर पक्षानं केला आहे.

नवरदेवाची आत्महत्येची धमकी
पण अजूनही यावर तोडगा निघू शकलेला नाही. आता नवरदेवानं न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिला आहे. वर पक्षानं आता पोलिसात धाव घेतली आहे आणि पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!