सन २०१९ मध्ये समोर आलेला कडकनाथ गैरव्यवहारातील आरोपी क्रमांक २ चा जामीन जिल्हा न्यायालयाकडून मंजूर.
एरंडोल- सदरचा गैरव्यवहार हा पाचोरा व मेहुणबारे चाळीसगाव पोलिस स्टेशन मध्ये दाखल केला होता सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६ , ४०९ सह ३४ व एमपी आयडी ऍक्ट कलम ३ नुसार गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यातील आरोपी हे रयत ऍग्रो कंपनी चे संचालक व असे एकूण १२ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झालेला होता त्यामधील ३ आरोपी विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखा जळगाव पोलिसांनी चार्जशीट दाखल केले. सदर गुन्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची पैशाच्या मोबदल्यात कडकनाथ कोंबड्या देण्यात आल्या होत्या परंतु सदर कंपनी बंद झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली होती. या प्रकरणांमध्ये आरोपी क्रमांक २ तर्फे अँडव्होकेट मधुकर बी.
देशमुख एरंडोल यांनी कामकाज पाहिले सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील यांनी आरोपीस जामीन मिळुनये म्हणून जोरदार युक्तिवाद केला परंतु आरोपीचे वकील अँड एम बी. देशमुख यांनी सरकारी वकीलांचे सर्व मुद्दे खोडून काढले यामुळे जिल्हा न्यायाधीश वावरे साहेब यांनी अटी शर्ती सह जामीन मंजूर केला.