धमकी दिली सेनेच्या आमदाराला ! समुद्रात फेकण्याची !
धमकी देणाऱ्यास दिले आवाहन स्वत: हजर झाले समुद्र किनारी पुढे काय झाले वाचा ?
मुंबई :जुगाड सरकारच्या मोरख्यांच्या ताब्यातून थेट गुवाहाटीहून माघारी येणारा बाळसाहेबांचा मर्द गडी , ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना दोन दिवसांआधी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यात नारायण राणे आणि नितेश राणे यांचं नाव फोनवरून धमकी देणाऱ्यांनी घेतलं होतं. मुंबईत आले तर मारून समुद्रात फेकून देऊ असंही धमकी देणाऱ्यांनी म्हटलं होतं.
धमकी देणाऱ्यांच आवाहन स्वीकारून गडी रांगडा चालून गेला ! समुद्राच्या त्या काठाशी मग .. काय ? आमदार नितीन देशमुख आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मुंबईच्या नरिमन पॉइंटवर वॉक करत होते . बराच वेळ झाला मात्र धमकी देणारे काही आले नाही. म्हणून शेवटी नितीन देशमुख त्या ठिकाणावरून निघून गेले. हे सच्चा ,निर्भीड ,निष्ठेच्या कार्यकर्त्याच्या मर्दुमकीच लक्षण आहे .
नितीन देशमुखांवर आयकर विभागाची कारवाई
ठाकरे गटाचे बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे मिंध्ये गटाच्या तावडीतून सुटून आल्यापासून मुद्दामहून जाणिवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने विविध खोट्यानाट्या कारवाया करून चौकशीचा ससेमिरा मिंध्येच्या इडि सरकारने सुरू ठेवला आहे . यांच्यावरील संकट संपता संपताना दिसत नाही. काही दिवसाआधी देशमुखांना एसीबी चौकशीला समोर जावं लागलं तर आज सकाळी चक्क जीवे मारण्याच्या धमकीचे दोन फोन आल्याचं नितीन देशमुखांनी सांगतली आहे. धमकी देणाऱ्यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांचं नाव घेऊन धमकी दिल्याचं म्हटलंय.
आता पर्यंत नारायण राणे यांनी मुंबईत मारून अनेकांना समुद्रात फेकून दिलं, असही धमकी देणाऱ्यांनी म्हटल्याच देशमुखांनी सांगितलं आहे. मुंबईला या तुमचाही समाचार घेऊ अस आवाहन धमकी देणाऱ्यांनी केल आहे. हे आवाहन स्वीकारून देशमुख मुंबईला आले. ज्या लोकांचे आता पर्यंत खून झाले, ज्यांचा ठावठिकाणा लागला नाही अश्यांचा 302 चा गुन्हा नारायण राणे यांच्यावर लावण्यात यावा अशी विनंती देशमुखांनी शासनाला केली आहे.