Viral Video : पोहता यावं म्हणून आईने गोंडस बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये फेकलं अन् घडलं.
Viral Video : इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांचे मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडीओ पाहून लोकांचा थरकाप उडतो.
अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. एक महिलेनं तिच्या गोंडस बाळाला थेट स्वमिंग पूलमध्ये फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या बाळाला पाण्यात पोहता यावं, यासाठी तिने बाळाला थेट स्विमिंग पूलमध्येच फेकलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. महिलेनं तिच्या बाळाला पाण्यात का फेकलं? असा प्रश्न अनेकांना पडला असेलचं. पण व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल.
Instructor teaches baby how to swim pic.twitter.com/QG7rRUDQ8q
— Engineering Ai (@EngineeringInsd) February 6, 2023
एक महिला तिच्या लहान मुलाला स्विमिंग शिकवण्यासाठी पुलाच्या बाहेरून त्या मुलाल थेट पाण्यात फेकत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर ती महिलाही पाण्यात जाते आणि मुलाला हातांनी इशारा करून बाहेर बोलवण्याचं प्रयत्न करते. पाण्यात गेल्यानंतर लहान मुलगाही पोहण्यासाठी धडपड करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर ती महिला मुलाल प्रेमाने जवळ घेते. मुलाल पाण्यात फेकल्यानंतर सुरुवातीला असं वाटतं की, हा मुलगा पाण्यात बुडेल. पण काही क्षणातच मुलगा पाण्यात पोहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल.