एरंडोल येथे बिअर बार चालकाची गळफास घेऊन आत्महत्या….
एरंडोल:- येथे म्हसावद नाका परिसरातील हॉटेल काशी परमिट रूम बियर बार वाईन शॉप चे संचालक विशाल विठ्ठल वंजारी (आंधळे) वय ३२ वर्ष. याने सरस्वती कॉलनी मधील राहत्या घरी घरातील सिलिंगला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आले. आत्महत्या मागचे कारण अजून समजू शकले नाही या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाल विठ्ठल वंजारी हा सकाळी न उठल्याने त्याला उठवण्यासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावर त्याचा चुलत भाऊ गेला असता घराचा दरवाजा लावलेला होता जोर जोराने आवाज दिल्यावर काहीही एक उत्तर मिळाले नाही. म्हणून घराची खिडकी लोटून बघितली असता विशाल हा घरातील सिलिंगला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर घरासमोर जमलेल्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन विशाल वंजारी यास खाली उतरून खाजगी वाहनाने बोहरी हॉस्पिटल म्हसावद नाका येथे नेले असता तपासणी अंति डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले.
रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई-वडील,भाऊ, पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे.