माझी वसुंधरा अंतंर्गत क्रिकेट स्पर्धेत या संघाने बक्षीस पटकावले..
प्रतिनिधी/अमळनेर : माझी वसुंधरा अंतंर्गत जळगाव जिल्ह्यातील आंतरनगरपालिका क्रिकेट स्पर्धेत चोपडा नगरपालिका संघाने प्रथम ,शेंदूर्णी नगरपंचायतीने द्वितीय तर अमळनेर नगरपरिषदेने तृतीय बक्षीस पटकावले. गेल्या तीन दिवसांपासून प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा सुरू होत्या.
माझी वसुंधरा अंतर्गत झालेल्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत भडगाव (गिरणा वारीयर्स),पाचोरा (सुपर स्टार), पाचोरा (डीएन पाटील संघ), अमळनेर (भूमी ), अमळनेर (जल), फैजपूर (नारखेडे), फैजपूर (दराडे) ,पारोळा(पीएमसी), एरंडोल (आरोग्य) ,एरंडोल (ग्रीन), चोपडा (आरोग्य),चोपडा (स्टाफ),धरणगाव ,वरणगाव (वारीयर्स) , जामनेर ,शेंदूर्णी ,नशिराबाद आदी संघांनी भाग घेतला होता. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नाणे फेक करून अंतिम सामना सुरू करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाययक आयुक्त जनार्दन पवार यांच्या हस्ते प्रथम चोपडा संघाला २१ हजार रोख व चषक असे बक्षीस देण्यात आले. द्वितीय शेंदूर्णी संघाला माजी नगराध्यक्ष विनोद लांबोळे यांच्याहस्ते ११ हजार रोख आणि चषक असे बक्षीस तर तृतीय अमळनेर संघाला ७ हजार व चषक बक्षीस देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , वरणगाव मुख्याधिकारी समीर शेख , एरन्डोल मुख्याधिकारी विकास नवाळे, शेंदूर्णी मुख्याधिकारी साजिद पिंजारी , सावदा मुख्याधिकारी किशोर चव्हाण , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड ,संजय चौधरी , अभियंता सत्येम पाटील , अभियंता अमोल भामरे ,दिगंबर वाघ ,विकास बिरारी ,आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण ,संतोष बिऱ्हाडे ,हैबत पाटील प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. उत्कृष्ट बॉलर ऋषी कलोसे (अमळनेर), उत्कृष्ट बॅट्समन मयूर पाचोरे , मॅन ऑफ द सिरीज मयूर पाचोरे , उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चंद्रकांत माळी ,उत्कृष्ट विकेट किपर योगेश बैसाणे याना चषक देऊन गौरव करण्यात आला. गोल्डी बिऱ्हाडे यांनी कॉमेंट्री केली. स्पर्धेस चेतन राजपूत , संजय पाटील , समाधान मैराळे , सुरेश कांबळे , रवी मोरे , नूर खान ,रोहित बटेजा हजर होते. मैदान बनवण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.