महिलेची विवस्त्र बॉडी डोक्यावर घेऊन गल्लोगल्ली फिरला, पहाटे कॉलनीत.., CCTV फुटेज पाहून पोलीसही अवाक्
उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेत असलेल्या मृतदेह सापडला आहे. एक व्यक्ती बराच वेळ मृतदेह डोक्यावर घेऊन फिरत होती. त्यानंतर त्याने एका कॉलनीच्या कोपऱ्यात तो मृतदेह फेकला आणि निघून गेला.
परिसरात राहणाऱ्या लोकांनी कॉलनीत एक बांधून ठेवलेलं पोतं पाहिलं. ते उघडल्यावर त्यात त्यांना महिलेचा विवस्त्र मृतदेह दिसला. घाबरलेल्या स्थानिकांनी लगेच पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिस फॉरेन्सिक तज्ज्ञांना आणि श्वानपथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ही घटना मेरठमधल्या सरखौदा पोलीस टाण्याअंतर्गत असलेल्या परिसरात घडली आहे.
मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये सकाळी ७.०५ वाजता एक व्यक्ती पोतं डोक्यावर घेऊन फिरताना दिसला. त्याने मृतदेह त्या पोत्यात भरला होता. या व्यक्तीचं वव ३५ ते ४० वर्ष इतकं आहे. मृतदेह कॉलनीमध्ये फेकल्यानंतर तो बराच वेळ तिथे फिरत होता.
पोत्यातला मृतदेह कोणाचा आहे? कुठून आणला होता? त्या तरुणीची हत्या कोणी केली आहे? हत्येचं कारण काय? मृतदेह फेकणारी ती व्यक्ती कोण होती? यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधील त्या व्यक्तीचे फोटो वेगवेगळ्या पोलीस टाण्यात पाठवण्यात आले आहेत.