जळगावात 20 फेब्रुवारी रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन
जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :- प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक/महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/कंपनी, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी, शासन यंत्रणा, खाजगी उद्योग व अन्न प्रक्रिया एस.पी.व्ही. इ. च्या उत्पादनांच्या प्रचार प्रसिध्दीसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत (Buyer-Seller Meet) ही बाब राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने खरेदीदार-विक्रेता संमेलन (Buyer-Seller) कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, 20 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या खरेदीदार-विक्रेता संमेलन (Buyer-Seller) कार्यक्रमात जळगांव जिल्ह्यातील प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये सहभागी वैयक्तिक लाभार्थी, भागीदार संस्था, युवक महिला उद्योजक, प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था/गट/कंपनी, स्वयं सहाय्यता गट, पुरस्कार प्राप्त शेतकरी/प्रगतशील शेतकरी व मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत लाभ घेतलेले लाभार्थी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.