व्हॅलेन्टाईन डे साजरा न करता खान्देश रक्षक संघटनेतर्फे अनोखा उपक्रम ..

IMG-20230215-WA0022.jpg

प्रतिनिधी/अमळनेर : संपूर्ण जगात व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असताना अमळनेरात मात्र खान्देश रक्षक फौंडेशन चे आजी माजी सैनिंक आणि राजमुद्रा लेझीम ढोल पथक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी काळा दिवस पाळून पुलवामा हल्यातील शहिदाना शेकडो दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
१४ रोजी सायंकाळी सहा वाजता पाचपावली मंदीर पासुुन शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करून फौजी कंमान्डर जीप वर,अमर जवानांचे, शहीद स्मारक बसवुन भव्य मिरवणूक त्रिकोणी बगीचा ,वड चौक , झामी चौक,पवण चौक मार्गे तिरंगा चौकात आली. तिरंगा चौकात शहिद जवानांना दिवे लावून,शहीद जवान अमर रहे,अशा घोषणा देत, खान्देश रक्षक फाउंडेशन चे अध्यक्ष,विजय सुरंवंशी यांनी,आज काळा दिवस का साजरा करावा या विशयी सविस्तर माहीती दीली व त्या हल्ल्यात शहीद 40 जवान यांची सर्वाची नावे घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित राजमुद्रा ढोल पथक , चे, पुनम हटकर , महेश मराठे, चेतन पाटील व हेमंत पाटील भूषण बारी सह तरुण मुले व मुली, आणि पोलीस निरीक्षक विजय शिंदे , पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे ,,पोलीस कर्मचारी, चंद्रकांत पाटील , मधुकर पाटील , सचिन पाटील , कैलास शिंदे , दीपक माळी ,रवी पाटील,सिध्दांन्त सिसोदे,आणि खान्देश रक्षक फाउंडेशनचे उपसंचालक, धनराज पाटील,
विलास महाले,
आत्माराम बडगुजर,
विनोद बिऱ्हाडे,
ईश्वर चौधरी,
शशिकांत वाघ,
धनराज रतन पाटील,
गणेश येशी,
जितेंद्र सोनवणे,
जगदीश पाटील
रऊफ पठाण
हेमंत आप्पा पाटील
मनोज पाटील
शैलेश चौधरी,
शरद पाटील
दीनेश सांळुखे यासह
इतर माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते,
मनोज शिंगाणे , गौरव पाटिल , हर्षल ठाकूर, सागर नाथवुवा, राहुल बडगुजर व पंकज शेटे महेश मराठे , चेतन पाटील ,हेमंत पाटील , हजर होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!