अभ्यास झाला नाही म्हणून विद्यार्थ्याने उचल टोकाचं पाऊल..

n4721532681676542352369f918f404e64ed2594255be85fc4c7faa09ab7918825e39c9e45b645fb527dd83.jpg

प्रतिनिधी नागपुरातून मन सुन्न करणारी घटना समोर आलेली आहे. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पेपरचा अभ्यास न केल्यामुळे त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.अभ्यास न झाल्यामुळे उद्याच्या पेपरमध्ये काय लिहिलणार, या टेन्शनमुळे एमसीएच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना मानकापूर येथील गोधनी रेल्वेलाईनवर बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यश माने अस मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो एमसीएचा विद्यार्थी होता. तो व्हीएमव्ही महाविद्यालयात एमसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशचा आज बुधवारी सकाळी एमसीएचा पेपर होता. मात्र, काल रात्री बारा वाजताच्या सुमारास तो घरातून कुणालाही न सांगता निघून गेला. यश रात्री घरून निघून गेल्यावर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.

मात्र तो कुठेही सापडला नसल्याने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी नातेवाईक गेले असता रेल्वेखाली उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!