ऐतिहासिक किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास अखेर परवानगी
आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे.औरंगाबाद येथील अजिंक्य देवगिरी फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत.
येथील किल्ल्यात होणाऱ्या या शिवजयंती सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य, महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत अजिंक्य देवगिरी फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आग्रा येथे ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितलेली होती. मात्र पुरातत्व खात्याने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी मिळेल असे म्हटले होते.त्यामुळे आता आग्रा किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.