निरोगी आरोग्यासाठी शरीरातील रक्त स्वच्छ असंण आवश्यक .

images-15.jpeg

आपली रोजची जीवनशैली कशी आहे? याचा मोठा परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊया असे कोणते अन्नपदार्थ आहेत ज्याच्या सेवनामुळे आपल्या शिरांमधील रक्त स्वच्छ राहू शकते आणि तुम्हाला रक्ताशी संबंधित कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही. चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊया –

लसूण

रोजच्या जेवणामध्ये लसणाचा वापर सर्रासपणे केला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का? रक्त शुद्ध करण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढवण्यासाठी लसूण सुद्धा उपयुक्त आहे याशिवाय लसणामध्ये अॅलिसिन असते जे रक्तवाहिन्यांना आराम देण्याचे काम करत असते.

हिरव्या पालेभाज्या-

हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्या शरीरातील रक्त वाढतेच, याशिवाय ते रक्त स्वच्छ करण्याचे कामही व्यवस्थित होते. त्यामुळे रक्त वाढीलाही मोठा फायदा होतो

गाजर

गाजर शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते. रोज गाजर खाल्ल्याने शरीरातील लोहाची पातळी नैसर्गिकरित्या वाढते. याशिवाय गाजराचा रस प्यायल्याने ब्लड काउंटच्या लेव्हल मध्येही वाढ होते.

टोमॅटो

रोजच्या वापरातील टोमॅटोचा वापर रक्त शुद्ध करण्यासाठी होतो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रक्त प्रवाह सुधारण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी आणि लोह रक्त निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढवण्यासाठी एकत्र काम करतात.

About Author

You may have missed

error: Content is protected !!