१ डिसेंबर जागतिक एड्स दिना निमित्त ग्रामीण रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन……
प्रतिनिधी – १ डिसेंबर ते १५ डिसेंबर अंतर्गत विविध एच आयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रम अंतर्गत एच आय व्ही तपासणी एच आय व्ही एड्स जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध शासकीय , खाजगी महाविद्यालय , बाजारपेठ , बस स्थानक, टॅक्सी स्टेंड , रिक्षा स्टेंड अती जोखमीचे विभाग अशा विविध ठिकाणी कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत ग्रामीण रुग्णालय एरंडोल या ठिकाणी कार्यक्रमाचे एच आय व्ही समुपदेशन व तपास केंद्र (ITC) स्थापना करण्यात आली आहे यात नागरिकांना मोफत समुपदेशन व तपासणी करण्यात येते तसेच तपासणी अंतर्गत एचआयव्ही बाधित आढळल्यास पुढील उपचारासाठी ART सेंटर ग्रामीण रुग्णालय अमळनेर या ठिकाणी एच आय व्ही संदर्भात उपचार मोफत सुरु कण्यात येतो एच आय व्ही संदर्भातील उपचार सुरू करतांना करण्यात येणाऱ्या सर्व तपासण्या मोफत केल्या जातात.
आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे समुपदेशक अंकुश थोरात हे रुग्णांना समुपदेशन करतात. एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२४ अंतर्गत आयसीवीसी येथे १८ ते ५० वयोगटात २१२१ पुरुष , महिला १६१५ व ७५८ गरोदर महिलांची एचआयव्ही तपासणी करण्यात बाली यात ०३ पुरुष , ०२ महिला तसेच ०१ युवक ०१ युवती व गरोदर महिला मध्ये ०१ गरोदर महिला एच आय व्ही सहजीवन जगत आहे असे आढळून आले त्याच बरोबर ग्रामीण रुग्णालय येथे लिंक ART केंद्र सुरु झाले आहे. या केंद्रात तालुक्यातील जवळपास १०० व्यक्ती एच आय व्ही वर ओषधी घेत आहे. या ओषधी उपचार त्यांना मोफत पुरविले जाते.
या सोबत तालुक्यात PHC रिंगणगाव , कासोदा PHC , तळई PHC याठिकाणी देखील एचआयव्ही तपासणी मोफत केली जाते .